करेतर उत्पन्न म्हणजे काय?
✅ Updated recently
करा व्यतिरिक्त इतर विविध स्रोतांपासून सरकारला जे इतर उत्पन्न मिळते त्याला करेतर उत्पन्न म्हणतात. कर उत्पन्नात उत्पन्न कर, वैयक्तिक प्राप्तिकर, संपत्ती कर इत्यादी कर येतात. करेतर उत्पन्नात गुंतवणुकीवरील व्याज, शुल्क, परवाना शुल्क, देणगी, अनुदाने, दंडात्मक उत्पन्न इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.