महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणतात. कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात.