फळे व बीजे यांच्यापासून मिळणारे तंतू : जास्त प्रमाणात वापरण्यात येणारा आणि विविध प्रकारे उपयोगात आणला जाणारा या प्रकारातला महत्त्वाचा तंतू म्हणजे कापूस होय. कापसाच्या झाडाला फुले येऊन त्यांपासून बनलेल्या बोंडांत कापूस तयार होतो.