काळ या वृत्तपत्राची सुरुवात शिवराम महादेव परांजपे यांनी केली. हे पत्र सुरू झाले तो काळ राजकीय चळवळीला व वृत्तपत्रांना खूपच प्रतिकूल होता. पण शिवरामपंतंवर झालेल्या शैक्षणिक व इतर संस्कारांमुळे अशा परिस्थितीतहि पत्र सुरू करण्याचे धाडस यांनी दाखविले.