भारतीय अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी या क्षेत्रावर आधारित आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने भारतीय शेती असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कृषी, वने व मत्स्य या तिघांचा अंतर्भाव भारतीय कृषी या विषयाअंतर्गत होतो. भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय.