राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख आहेत तर पंतप्रधान हे शासन प्रमुख आहेत. घटनांमध्ये पंतप्रधानांच्या निवडीसाठी नियुक्तीसाठी कोणतीही विशेष पद्धत सांगितलेली नाही. कलम 75 मध्ये केवळ एवढेच सांगण्यात आले आहे की राष्ट्रपती पंतप्रधान यांची नियुक्ती करतील.