रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले जे अजैविक पदार्थ असतात, त्यांनाच खनिजे असे म्हणतात. लोह, मँगनीज, सोने इत्यादी खनिजे जमिनीमध्ये असतात. ह्या खनिजांचा उपयोग कारखान्यांमध्ये, घरगुती वापरासाठी, तसेच दागिने व शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. या खनिंजापासून आपल्याला विविध धातू तसेच रसायने मिळतात.