खनिजांचे महत्त्व इतके आहे की, त्यांच्याशिवाय उद्योगधंद्याचे पान हलत नाही. युद्धाच्या व शांततेच्या काळी अतिशय महत्त्वाच्या आणि गरजेच्या वस्तू, अस्त्रे, वाहने वगैरे अनेक गोष्टी खनिजांपासून बनवितात. त्यांचा उपयोग अगदी आवश्यक व अटळ असतो. काही खनिजे अतिशय महत्त्वाची व मोक्याची असतात.