गाळाचा खडक कशासाठी वापरला जातो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
डोंगराळ प्रदेशातील नद्या सपाट प्रदेशात शिरताच त्यांचा वेग कमी होतो व त्यामुळे त्यांच्या पाण्याबरोबर वाहत आलेल्या पदार्थांपैकी अधिक भरड पदार्थ उदा., वाळू व भरड गाळवट टाकून दिले जातात. पुराचे पाणी ओसरल्यावर नद्यांच्या काठांवर गाळाच्या (जलोढाच्या) राशी साचतात.