प्रत्येक कोशिकेत गुणसूत्रांचा एक संच, म्हणजे गुणसूत्रांच्या पूर्ण संख्येच्या निम्मी गुणसूत्रे असतात. दोन युग्मकांचा संयोग झाल्यावर द्विगुणित गुणसूत्रसंख्या मूळपदावर येते. प्रत्येक पिढीत द्विगुणित व्यक्ती एकगुणित युग्मके उत्पन्न करतात आणि त्यांच्या संयोगाने एक नवी द्विगुणित पिढी उत्पन्न होते.