सजीवाच्या सर्व गुणसूत्रांवरील सर्व जनुकांचा डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (डीएनए) संरचना, त्यांचे स्थान, क्रम, कार्य, प्रकार, जाळे, विकृती यांची इत्थंभूत माहिती देणारा आराखडा म्हणजे जीनोम होय. यास सजीवाची 'जनुकीय कुंडली' असेही म्हंटले जाते.