गोव्याला पोर्तुगालपासून कधी स्वातंत्र्य मिळाले?
✅ Updated recently
१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले.