एखाद्या तारेतून विद्युत् प्रवाह सोडला असता तिच्याभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते, हे त्यांनी दाखविले. १८२० साली अँपिअर यांनी विद्युत् प्रवाह वापरून कृत्रिम चुंबक बनविता येतो, हे सिद्ध केले. ॲरागो यांनी त्याच वर्षी पहिला विद्युत् चुंबक तयार केला.