सिद्दीने पोर्तुगीजांशी केलेली ही छुपी युती कालांतराने दोघांच्याही अंगास आली, कारण १६८२ च्या जून-जुलैमध्ये संभाजीराजांनी रेवदंड्यास वेढा दिला , बरेच दिवस तो चालला. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी उत्तर कोकणातील दोन किल्ले जिंकले तसेच जुनी साष्टी ब बारदेस येथेही चढाई केली.