केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा 'आधुनिक जगाचा इतिहास' या घटकात अंतर्भाव होतो. अर्थात, या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत.