फळ, फुल व इतर सर्व झाडामध्ये गवत ही सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती आहे. बांबू हा एक गवताचा प्रकार आहे, जो अतिजलद वाढतो. चीनमधील काही बांबूच्या प्रजाती इतक्या जलद वाढतात की आपण चक्क डोळ्याने पाहू शकतो, दिवसाला काही इंच! विश्वास बसणार नाही पण काही बांबूच्या प्रजाती एका दिवसात चक्क ३५ इंच म्हणजे सुमारे ३ फूट वाढतात!