व्यक्तिगत पातळीवर पाण्याचा जपून वापर. - लाखो, करोडो सुशिक्षित कुटुंबात सकाळी कितीतरी लिटर पाणी शिळे झाले म्हणून गटारात टाकण्यासाठी मोरीत सोडले जाते. परंतु जलाशयात महिनो न् महिने साठविलेले पाणी नळाच्या तोटीतून घरात ताजे पाणी म्हणून प्रवेश करते, हे ओरडून सांगणे म्हणजेच जलसाक्षरता.