जैव खत कसे बनवायचे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा, जनावरांचे मलमूत्र व जैविक संवर्धनांचा संयुक्तपणे वापर करावा. या पदार्थांपासून ढीग पद्धत, खड्डा पद्धत, नाडेप कंपोस्ट आणि पीडीकेव्ही कंपोस्ट पद्धतीने खतनिर्मिती करता येते. या खतामध्ये अन्नद्रव्यांचे चांगले प्रमाण असते.