लागवडीसाठी हेक्‍टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर आणि 250 ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.