1 नोव्हेंबर 1956 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींनुसार, तत्कालीन हैदराबाद (तेलंगण) प्रांत भाषिक आधारावर आंध्र प्रदेशात विलीन करण्यात आला होता. परंतु राज्याचा हा भाग इतर भागांच्या तुलनेत आर्थिक, शैक्षणिक आणि इतर सर्वच पातळ्यांवर मागासलेला होता. यानंतर लगेचच तेलंगणाला वेगळे राज्य करण्याची मागणी पुढे आली.