नगरपालिका आणि नगरपरिषद यातील मुख्य फरक लोकसंख्या आहे.
ज्या शहराची लोकसंख्या 100,000 पेक्षा जास्त असते तेथे नगर पालिका असते.
ज्या शहराची लोकसंख्या 15,000 ते 25,000 इतकी असते तेथे नगर परिषद असते.
यात काही अपवाद देखील आहेत परंतु मुख्य फरक हा लोकसंख्येचा आहे.
मध्यम आकाराच्या शहराचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका म्हणतात. अशा नगरपालिकेवर सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांना सल्ला, सूचना आदी देण्यासाठी लोकनियुक्त सभासदांची एक सभा असते. तिच्या नेत्याला नगराध्यक्ष असे म्हणतात. नगरपालिका ही शहराचे दैनंदिन प्रशासन पाहते. नगरपालिकेच्या निवडून आलेल्या किंवा नेमलेल्या सभासदाला, नगरसेवक म्हणतात.
नगरपरिषदेचे अ,ब,क असे तीन वर्ग करण्यात आले आहेत. 10,000 ते 30,000 लोकसंख्येसाठी ‘क’ वर्ग नगरपरिषद, 30,000 ते 75,000 लोकसंख्येसाठी ‘ब’ वर्ग नगरपरिषद तर 75,000 पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी ‘अ’ वर्ग नगरपरिषद असते. नगर परिषदेवर प्रौढ मतदान पद्धतीने उमेदवार निवडून दिले जातात. नगर परिषदेवर प्रौढ मतदान पद्धतीने उमेदवार निवडून दिले जातात. नगर परिषेदेवरील सदस्यास ‘नगरसेवक’ म्हणतात.