नगरपालिका- महाराष्ट्रात सध्या 221 नगरपालिका आहेत. पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या किंवा शेती सोडून अन्य व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण 3/4 असल्यास किंवा एक चौरस किलोमीटर मध्ये एक हजार लोकसंख्या असेल किंवा लोकसंख्या कमी असूनही शहराचे उत्पन्न जास्त असेल तर राज्य शासन नगरपालिका स्थापन करू शकते. नगरपालिकेचे लोकसंख्येच्या आधारावर वर्गीकरण केले जाते.

नगरपालिकांचे वर्गीकरण- अ वर्ग नगरपालिका- एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपालिकेला अ वर्ग नगरपालिकेचा दर्जा दिला जातो.

ब वर्ग नगरपालिका-1 लाख ते 40 हजार दरम्यान लोकसंख्येच्या नगरपालिकेला ब वर्ग नगरपालिकेचा दर्जा दिला जातो

क वर्ग नगरपालिका- 40 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिकेला क वर्ग नगरपालिकेचा दर्जा दिला जातो.