१८८८ साली स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय. स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ साली केवळ मद्रास, कलकत्ता आणि मुंबई ह्या शहरांसाठीच महानगरपालिका होत्या. नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते.