महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असल्याने महाराष्ट्राच्या विदर्भातील व्यावसायिक आणि राजकीय हालचालींचे प्रमुख केंद्र अशीही नागपूरची ओळख आहे. विदर्भात विशेषत: नागपूर जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने या शहरातून देशभरात संत्र्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असतो.