पुढे व्हाइसरॉय लॉर्ड जॉन रिपन ( कार. १८८०—८४) याने १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना मर्यादित स्वरूपात स्वायत्तता दिली. जिल्हा लोकल बोर्ड सुरू करून खेड्यांपर्यंत स्थानिक स्वराज्याची कल्पना प्रसृत केली.