निती आयोगाचे मुख्यालय कुठे आहे?
✅ Updated recently
नीतीचा उपाध्यक्ष हा आयोगाचा कार्यकारी प्रमुख असतो. आयोगामध्ये सरकारी आणि खाजगी संस्थांतील तज्ज्ञांची वेळोवेळी सदस्य म्हणून नेमणूक करण्याची व्यवस्था आयोगाद्वारे करण्यात येते. नीतीमध्ये 'टीम इंडिया हब' आणि 'इनोव्हेशन हब' अशी दोन नवीन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. राजधानी दिल्ली येथे या आयोगाचे मुख्यालय आहे.