नियोजनतंत्राचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे विनियोगविषयक निर्णय हा होय. विकासवेग किती असावा ह्यासंबंधीच्या निर्णयाशी विनियोग-निर्णय संबंधित आहे. ज्या ज्या देशात नियोजन चालू आहे, त्या त्या देशात विकासवेग स्पष्टपणे ठरविला जातो.