निसर्ग संवर्धन महत्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
माती, पाणी, हवा, उर्जा, खनिजे, वन्यजीव, वनस्पती या सारखी निसर्ग संपदा तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. त्यामुळे त्याचं संवर्धन करणं अत्यावश्यक बाब बनली आहे. रशियन विचारवंत लिओ टॉलस्टॉय म्हणतो की, मानव आणि निसर्गामध्ये असलेला सकारात्मक बंध कायम राहणे ही आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाची आणि प्राथमिक गोष्ट आहे