भारताच्या संविधानाच्या ७५ व्या व ८४व्या कलमांनुसार पंतप्रधान बनण्यासाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. लोकसभा अथवा राज्यसभेचा खासदार. सरकार स्थापनेच्या वेळेला जर ही अट पूर्ण झाली नसेल तर त्या व्यक्तीला ६ महिन्यांच्या आत खासदार पद मिळवावे लागते.