पुणे विभाग :
या विभागाच्या पश्चिमेस कोकण विभाग, पूर्वेस औरंगाबाद विभाग, उत्तरेस नाशिक विभाग व दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे.
थोडक्यात माहिती
क्षेत्रफळ - ५७,२६८ किमी²
लोकसंख्या (२०११ची गणना) - ९४ लाख २६ हजार ९५९ इतकी आहे
जिल्हे - कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा
साक्षरता - ७६.९५%
ओलिताखालील जमीन : ८,८९६ किमी²
मुख्य पिके - ज्वारी, गहू, बाजरी, ऊस, तांदूळ, सोयबीन, कांदा, भुईमुग, द्राक्ष
सन २०११ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्याची लोकसंख्या ९४ लाख २६ हजार ९५९ इतकी आहे. यामध्ये पुरुषांची लोकसंख्या ४९ लाख ३६ हजार ३६२ म्हणजेच ५२.३६ टक्के इतकी आहे तर स्त्रियांची लोकसंख्या ४४ लाख ९० हजार ५९७ म्हणजेच ४७.६४ टक्के इतकी आहे.
पुणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. पुणे हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या काठावर वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सार्वजनिक सुविधा आणि विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे आघाडीवर आहे.
अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमुळे पुणे हे शहर ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणूनही ओळखले जाते. पुण्यात अनेक तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल उद्योग आहेत, त्यामुळे पुणे भारताचे “डेट्रॉईट” वाटते. अतिशय प्राचीन ज्ञात इतिहासापासून पुणे शहराला महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ मानले जाते. मराठी भाषा ही या शहराची प्रमुख भाषा आहे.
पुणे जिल्ह्याचा भौगोलिक स्थान व विस्तार
पुणे जिल्ह्याचा अक्षवृत्तीय विस्तार १७ अंश ५४’ ते १० अंश २४’ उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार ७३ अंश १९’ ते ७५ अंश १०’ पूर्व रेखावृत्तापर्यंत आहे. पुणे जिल्ह्याच्या सीमेस उत्तरेस व पुर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेय सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा व वायव्येला ठाणे जिल्हा आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यास अहमदनगर, सोलापूर, सातारा, रायगड व ठाणे या पाच जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत.
पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ
पुणे जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १५,६४२ चौ.किमी. आहे. क्षेत्रफळानुसार पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक लागतो. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. महाराष्ट्र राज्याचे ५.१० क्षेत्र पुणे जिल्ह्याने व्यापलेले आहे.
पुणे जिल्ह्याची प्राकृतिक रचना
जिल्ह्याचा पश्चिम भाग सह्याद्री पर्वताचा आहे. जिल्ह्याच्या या भागात शिंगी, तसुबाई, मांडवी, ताम्हीणी, अंबाला इत्यादी डोंगर आहेत. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर हरिश्चंद्र डोंगर आहे. जिल्ह्यात माळशेज, बोर, ताम्हीणी, वरंधा, कात्रज, दिवे इत्यादी प्रमुख घाट आहेत. सह्याद्री पर्वतात भीमाशंकर, तसुबाई, शिंगी इत्यादी शिखरे आहेत. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पुरंदर टेकड्या आहेत. जिल्ह्याचा मध्य व पूर्वभाग पठारी प्रदेशाचा आहे.
पुणे जिल्ह्यातील तालुके
पुणे जिल्ह्यामध्ये एकूण १४ तालुके आहेत. यामध्ये हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ, पुणे शहर यांचा समावेश होतो.
पुणे जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय रचना
पुणे जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात मोडतो. पुणे प्रशासकीय विभागमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. जिल्ह्यात २ महानगरपालिका, १३ नगरपालिका, ३ कटक मंडळे, १४ तालुके, १३ पंचायत समित्या, ८ महसूल उपविभाग, १४७८ गावे आणि १४०७ ग्रामपंचायती आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे, बारामती, मावळ व शिरूर असे ४ लोकसभा मतदारसंघ आणि २१ विधानसभा मतदार संघ आहेत. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये आरटीओ वाहन नोंदणी क्रमांक ३ आहेत. यामध्ये पुणे- एमएच १२, पिंपरी-चिंचवड एमएच -१४ आणि बारामती एमएच – ४२ असे विभाग आहेत.
राजकीय व प्रशासकीय रचना :
संस्था संख्या नावे
महापालिका २ पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
नगरपरिषदा १३ भोर, लोणावळा, जुन्नर, आळंदी, सासवड, जेजुरी, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती,
तळेगाव-दाभाडे, राजगुरूनगर, चाकण
पंचायत समित्या १३ हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी,
मावळ
कटक मंडळे ३ पुणे कॅन्टोनमेंट, खडकी कॅन्टोनमेंट व देहूरोड कॅन्टोनमेंट
महसूल उपविभाग ८ हवेली, पुणे-शिरूर, भोर-वेल्हे, मावळ-मुळशी, दौंड-पुरंदर, जुन्नर-आंबेगाव, खेड,
बारामती-इंदापूर
पुणे विभागात किती जिल्हे आहेत?
✅ Updated recently