पाणी आणि कार्बनच्या घटकांशिवाय जीवसृष्टी निर्माण झाली नसती. हे दोन्ही घटक पृथ्वीवर कसे पोहोचले, याबाबतही संशोधकांना कुतूहल असते. अलीकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, सौरमंडळ विकसित झाल्यावर वीस लाख वर्षांनी म्हणजे सध्यापासून 4.56 अब्ज वर्षांपूर्वी एका उल्केच्या माध्यमातून पृथ्वीवर पाणी आले.