पौगंडावस्था सुरू होण्याचे वय 10 ते 18 वर्षे वयापर्यंत बदलते. हे वय व्यक्ती-व्यक्तीनुसार, लिंगानुसार आणि जाती-जमाती-वंशानुसार बदलते. अनेक अभ्यासांतून आता असे निदर्शनास येत आहे की हे वय गेल्या शतकापासून हळूहळू कमी होत आहे. काही प्रगत देशांत 1840 साली ते 16-17 होते ते आता 10 वर्षांच्या आसपास आहे.