२०० किमी. पर्यंत अतितीव्र वारे वाहतात व जोरदार पाऊस पडतो. त्यापुढे ५०० ते ८०० किमी. पर्यंत वाऱ्याची गती, ढगाचे आणि पावसाचे प्रमाण कमी होत जाते आणि शेवटी वारा मंद होतो, ढगाचे प्रमाण बरेच कमी होते आणि पाऊस बंद झालेला असतो.