प्रशासकीय कायद्याद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी किंवा उत्तरदायित्व ठरविली जाते. प्रशासकीय अधिकारी व नागरिक यांचे संबंध कसे असावेत, त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये कोणती असावीत हे ठरविणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्थान ठरविणे, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे यासंबंधी हा कायदा केला जातो.