फिअरलेस गव्हर्नन्स या पुस्तकाचे लेखक डॉ.किरण बेदी आहेत. किरण बेदी या पुद्दुचेरीच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नर आणि निवृत्त आयपीएस आहेत. हे पुस्तक डॉ. बेदी यांच्या पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून सुमारे पाच वर्षांच्या सेवा आणि भारतीय पोलीस सेवेतील 40 वर्षांच्या त्यांच्या अफाट अनुभवावर आधारित आहे. 'फिअरलेस गव्हर्नन्स' हे सुशासन आणि नेतृत्वावर वाचायला, बघायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळणारं पुस्तक आहे. यामध्ये त्यांनी सांघिक भावना, सहकार्य, आर्थिक विवेक, प्रभावी पोलिसिंग, सेवांमधील बंधन आणि निर्भय नेतृत्वाद्वारे निर्णय घेणे याविषयी माहिती दिली.