बटाटा हे थंड हवामानातील पीक असून असेच हवामान त्याचे वाढीस पोषक असते. महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगामात याचे अधिक उत्पादन येते. साधारणत: याची लागवड २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या दरम्यान करतात.