ज्या शेतीला बारमाही पाणी उपलब्ध असते. अशा शेतीला 'बागायती शेती' म्हणतात. बागायती शेतीत खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात पिके घेतली जातात किंवा जेथे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात हमखास पाणी पुरवठा करणे शक्य आहे तेथे दोन पिके घेतली जातात.