बाजारपेठ संशोधन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कंपनीसाठी बाजाराचा, ग्राहकाचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे असते आणि तेच काम मार्केट रिसर्च अर्थात बाजार संशोधन या अंतर्गत करावे लागते. बाजार संशोधन हा विक्री तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही कंपनीला त्यांचे एखादे नवे उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी योग्य नियोजन करावे लागते.