बारामती तहसीलचे क्षेत्रफळ १३८२ चौ.कि.मी. एकशे सोळा मुख्य गावे आणि याहून अधिक उप-गावे तहसील प्रदेशात आहेत.बारामती शहर कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. संदर्भशिवकाळात बारामती तालुक्यातील सूपे परगणातील समावेश होता.सूपे परगणाचे प्रमुख संभाजी मोहिते यांची बहीण तुकाबाई या शहाजीराजे यांची पत्नी.सुपे ही शहाजी भोसले यांची सासरवाडी होती . आजही सूपे गावात इतिहासाच्या खुणा सापडतात. शरद पवार यांची जन्मभूमी काटेवाडी हे गाव बारामती जवळ आहे .बारामती तालुक्यात साखर कारखाने सहकारी व खाजगी तत्त्वावर चालणारे आहेत .बारामती मधील एम आय डी सीला चांगला नावलौकिक मिळालेला आहे .वेस्पा ही दुचाकी येथील प्रशिद्द गाडी आहे. मोठा संपूर्ण बारामती तालुक्याचा विकास राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे झालेला आहे. कृषी, उद्योग, शेती पूरक व्यवसाय, सहकारी संस्था यांचं संपूर्ण जाळं तालुक्यांमध्ये निर्माण केलेल आहे. बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून कविवर्य मोरोपंत सार्वजनिक वाचनालय चालवले जाते. या वाचनालयाचा लाभ बारामती शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण विद्यार्थी, महिला तसेच मुले घेतात. याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुद्धा उपलब्ध आहे. बारामतीच्या भिगवण चौकात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ग्रंथालयाचा सर्वांना लाभ मिळतो. याच ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये श्रीधर स्वामी सभागृह देखील आहे ज्या श्रीधर स्वामींनी बारामतीच्या करा नदी काठावर बसून शिवलीलामृत हा ग्रंथ लिहिला अशा या थोर पुरुषांची आठवण म्हणून या सभागृहाला त्यांचं नाव देण्यात आलेला आहे