बियाण्यांची उगवण क्षमता किंवा जर्मिनेशन पॉवर म्हणजे एखाद्यात बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे, ते तपासणं. बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याच्या तीन पद्धती अशा आहेत, ज्या शेतकरी स्वत: घरी करून पाहू शकतात. पहिली म्हणजे गोणपाट पद्धत. या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता तपासू शकतात.