बोधनिक मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या शाखेत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. त्यावर संशोधने केली जातात. संवेदन स्मृती, विचार प्रक्रिया, बुद्धिमत्ता, समस्या परिहार, भाषा शिकणे, निर्णय प्रक्रिया, सृजनशीलता या सर्व प्रक्रियांना बोधनिक किंवा मानसिक प्रक्रिया असे म्हटले जाते. या प्रक्रिया मेंदूशी निगडित आहेत.
बोधनिक पुरातत्त्वाचे दोन भाग पडतात : आपल्या मानवजातीच्या (होमो सेपिएन्स) अगोदर ज्या मानवसदृश (उदा., ऑस्ट्रॅलोपिथेकस)आणि इतर मानवजाती (उदा., होमो इरेक्टस) होत्या, त्यांच्यामधील आकलनक्षमतेच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणे हे पहिले उद्दिष्ट आहे. कारण स्वभान आणि भाषेचा वापर यांचा उगम होमो सेपिएन्सच्या अगोदर झालेला आहे. चिंपँझींना मानवी भाषा शिकविण्याच्या प्रयोगांमध्ये असे दिसून आले आहे की, हे प्राणीदेखील माणसांप्रमाणे भाषिक कौशल्याचा काही भाग आत्मसात करू शकतात. त्यांना बोलता येत नसले, तरी ते खाणाखुणा वापरण्याचे तंत्र शिकू शकतात. बोधनिक पुरातत्त्वाचा दुसरा भाग आपल्या मानवजातीमधील आकलनक्षमतेच्या उत्क्रांतीशी संबंधित आहे. होमोसेपिएन्समध्ये प्रतीकांचा वापर करून परस्परसंवादाची कला आणि बोलण्याची भाषिक क्षमता पूर्ण विकसित झाली. तसेच उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मेंदूमध्ये कसकसे बदल घडत गेले, याचा अभ्यास बोधनिक पुरातत्त्वविज्ञानात केला जातो. अधिक प्रगत आकलनक्षमतेचा संबंध जगभरात अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या लेखनकलेशी, कलात्मक दृष्टिकोनाशी, काळ या संकल्पनेशी, नियोजन करण्याच्या क्षमतेशी आणि धर्मविषयक संकल्पनांशी आहे. साहजिकच पुरातत्त्वीय माहितीखेरीज भाषाशास्त्र, मानसशास्त्र, मेंदूवरच्या जीववैज्ञानिक संशोधनातून मिळणारी माहिती आणि मानवेतर प्रायमेट गणातील प्राण्यांमधील आकलनक्षमता व त्यांचे वर्तन या सगळ्यांचा विचार बोधनिक पुरातत्त्वविज्ञानात केला जातो.
बोधनिक म्हणजे काय?
✅ Updated recently