भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा तो प्रमुख आहे. पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा व राज्यसभा ह्या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. विद्यमान राष्ट्रपतीने नियुक्ती केलेला भारताचा पंतप्रधान देशामधील सर्वात बलाढ्य नेता समजला जातो.