ग्राहकांच्या हितासाठी १९६६ मध्ये प्रथमत: मुंबईतील काही सुविद्य गृहिणींनी पुढाकार घेऊन कन्झ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. त्याच वर्षी ग्राहक हित जपण्याच्या उद्देशाने उत्पादक आणि व्यापारी यांनी उचित व्यापार आणि व्यवहार संघटना स्थापन केली. हाच भारतातील ग्राहक चळवळीचा उगम मानला जातो.