नियंत्रित बाजारपेठा : भांडवलदारी उत्पादन पद्धतीत उत्पादन हे प्रामुख्याने विक्रीसाठी केले जाते. अंतिम ग्राहकांना पाहिजे त्या ठिकाणी व पाहिजे त्या स्वरूपात वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मोठे व्यापारी, लहान व्यापारी, दलाल ह्यांची बाजारपेठेत एक साखळी तयार झालेली असते.