'शेअर बाजार' म्हणजे एक अशी जागा ज्या ठिकाणी कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. जेव्हा एखाद्या कंपनीची वाढ होते तेव्हा शेअर्सची किंमतही वाढते. अशा वेळेस काही नवीन लोकांना ते शेअर्स खरेदी करण्याची इच्छा होते. त्याच वेळेस ज्यांनी अगोदर शेअर्स विकत घेतलेले असतात त्यांना ते नफा करून घेण्यासाठी विकायचे असतात.