भारतातील शहर क्षेत्रीय नियोजन
भारतात १९६० पासून क्षेत्रीय नियोजनाची गरज लक्षात येऊ लागली. दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या शहरांतून एकापाठोपाठ एक क्षेत्रीय योजना मंडळे स्थापना झालेली दिसून येतात. त्यानंतर 'महाराष्ट्र क्षेत्रीय आणि नगर नियोजन अधिनियम, 1966' कायदा आला जो देशातील या दिशेने झालेला पहिला कायदा होता.