स्वतःच्या भावना जाणणे, स्वतःची अभिरुची, मर्यादा, बलस्थाने यांची जाणीव असणे, आपले निर्णय घेण्यासाठी भावनांमधील प्राधान्यतेचा वापर करणे, स्वतःच्या क्षमतांचे वास्तव व यथायोग्य मूल्यमापन करणे, ठाम आत्मविश्वास असणे इत्यादी आत्मप्रचिती या घटकात येतात. या घटकामध्ये भावनांची जाणीव किंवा ओळख, अचूक आत्मपरीक्षण आणि आत्मविश्वास हे तीन उपघटकही येतात.

निकोप व निरोगी जीवनासाठीचा सर्व कौशल्यांचा समावेष होतो. भावनिक दृष्ट्या स्थैर्य आणि भावनिक दृष्ट्या परिपक्व असणारा विद्यार्थी वा व्यक्ती नेहमी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवूनच समाजामध्ये वावरत असतात. अशा व्यक्ती स्वयंप्रेरणेतून कार्य करत असून कोणत्याही परिस्थितीत समायोजन साधण्यात तत्पर असतात. आजच्या स्पर्धात्मक काळात अनेक समस्या, ताणतणाव येत असतात. त्या सोडविण्यासाठी ‘स्व समायोजन क्षमता’ अंगी असणे गरजेचे आहे. भावनिक बुद्धिमत्तेमुळे विद्यार्थ्यातील वा व्यक्तितील कार्य करण्याची शक्ती, उर्जा, उत्साह हे मजबूत होत असते.