व्यक्तिच्या सबंध आयुष्यभराच्या शिक्षणाचा विचार महात्मा गांधींनी या पद्धतीत केला आहे. केवळ पुस्तकी, पारंपरिक आणि पोपटपंची शिक्षणाऐवजी शारीरिक आणि बौद्धीक अशा दोन्ही श्रमांची जोड घालून शिक्षण द्यावं, असा विचार या पद्धतीत त्यांनी केला होता. हे शिक्षण हस्तोद्योगाच्या माध्यमातून दिलं पाहिजे असं त्याचं मत होतं.