प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भाग भांडवलामध्ये भारत सरकार ५० टक्के, पुरस्कर्ता राष्ट्रीयकृत बँक ३५ टक्के आणि राज्यशासन १५ टक्के याप्रमाणे हिस्सा आहे. महाराष्ट्रात बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बँक प्रादेशिक ग्रामीण बँकेची पुरस्कर्ता बँक आहे.