१९१७ ते २० च्या अवधीत ब्राह्मणेतर किंवा सत्यशोधकी धिंगाण्याने महाराष्ट्रात अनन्वित धुमाकूळ घातला. ह्या धिंगाण्याला चळवळ हे नाव देऊन संबोधणे म्हणजे त्या शब्दाचा व त्या अभिधानाने ओळखावयाच्या इतर कार्याचा अपमान करण्यासारखे आहे. इतकी ही सत्यशोधकी वावटळीची हीन वळवळ होती.